7/12 Correction/Updation Online | ७/१२ नाव, जमीन चूक दुरुस्ती

जेव्हा तुम्हाला तुमच्या हस्तलिखित आणि ऑनलाईन सातबाऱ्यात काही चूक आढळून आल्यास ती चूक दुरुस्त करण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन ई-हक्क प्रणाली द्वारे तलाठी कडे अर्ज करू शकता. या चुका खातेदाराच्या नावात, खातेदाराच्या क्षेत्रफळात, एकूण क्षेत्रफळात किंवा इतर कुठल्याही माहिती मध्ये असू शकतात. तर चला जाणून घेऊया कि सातबाऱ्यात Correction करण्यासाठी तलाठी कडे ऑनलाईन अर्ज कसे करतात.

Public Data Entry (pdeigr)
संपत्ती नोंदणी आणि ७/१२
दुरुस्ती/अद्यायावत करणे

Pubilc Data Entry या पोर्टल वर तुम्ही Property Registration आणि ७/१२ Correction/Updation करू शकता. तसेच या पोर्टल वर तुम्हाला इतर सुविधा हि भघायला मिळतील.

७/१२ Online Correction/Updation करण्याची प्रक्रिया

 • सर्वात आगोदर Pubilc Data Entry या पोर्टल वर गेल्यावर तूम्हाला समोरील माहिती भरून Registration करून घ्यावे लागेल.
  • नाव
  • Username & Password
  • मोबाईल आणि ई-मेल
  • Pan कार्ड नंबर
  • Address Details
 • त्यानंतर Registration करते वेळी तुम्ही जो Username आणि Password बनवला तो वापरून आणि Captcha Solve करून या पोर्टल वर Login करून घ्या.
 • Login केल्यानंतर अनेक पर्याय तुमच्या समोर येतील त्यातून तुम्हाला ७/१२ Mutations हा पर्याय निवडायचा आहे.
 • Role Selection मध्ये तुम्हाला समोरील पैकी एक पर्याय निवडायचा आहे.
  • User is Bank
  • User is Citizen
  • Other
 • आता तुम्हाला तुमच गाव निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला Correction म्हणजेच फेरफार करावयाचा प्रकार निवडायचा आहे. खाली दिलेल्या फेरफार प्रकारांपैकी तुम्हाला हस्तलिखित व संगणीकृत ७/१२ मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज हा प्रकार निवडायचा आहे.
  • वारस नोंद
  • बोजा कमी करणे
  • बोजा चढविणे
  • खातेदाराची माहिती भरणे
  • हस्तलिखित व संगणीकृत ७/१२ मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज
  • इकरार
  • अ.पा.क शेरा कमी करणे
  • विश्वस्तांचे नाव बदलणे
  • मयताचे नाव कमी करणे
  • ए.कु.मे नोंद कमी करणे
 • तुमच्या स्क्रीन वर ७/१२ मधील चूक दुरुस्त करण्यासाठी चा अर्ज येईल त्या मध्ये तुम्हाला समोरील बाबी भरायच्या आहेत.
  • अर्जदाराची माहिती
  • खातेदाराची माहिती
  • कागदपत्रे जोडा (यात तुम्हाला तुमचा हस्तलिखित ७/१२ pdf file मध्ये Upload करायचा आहे file ची size ही ३०० KB पेक्षा जास्त नसावी)
 • शेवटी तुमचा अर्ज Submit करून द्या त्यानंतर तुमच्या फेरफार अर्जाची आणि पोहच पावती ची Print काढून घ्या.

अर्ज Submit केल्यावर तो थेट तलाठी कडे जाईल त्यानंतर तलाठी ७/१२ दुरुस्ती ची पुढील प्रक्रिया राबवेल.

Visit Public Data Entry

1 thought on “7/12 Correction/Updation Online | ७/१२ नाव, जमीन चूक दुरुस्ती”

Leave a Comment