Land Records मध्ये जेव्हा काही Changes होतात तेव्हा त्याला Property Mutation/Updation म्हणतात. यालाच आपण महाराष्ट्रात ७/१२ Ferfar असे म्हणतो तर चला जाणून घेऊया याबद्दल.
फेरफार म्हणजे काय?
फेरफार म्हणजे ७/१२ उताऱ्याच्या माहिती मध्ये बदल करणे. उदाहरणार्थ जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकतो तेव्हा मालकाच्या नावामध्ये बदल करण्यासाठी फेरफार करावा लागतो. फेरफार चे अनेक प्रकार असतात ते आपण पुढे बघू.
पोर्टल | Aapli Chawdi (आपली ई चावडी) |
कशासाठी | फेरफार नंबर, माहिती, नोटीस, स्थिती बघण्यासाठी |
अधिकृत वेबसाइट | Aapli Chawdi |
खालील सर्व mahabhulekh ferfar चे प्रकार आहेत. खालील कारणांसाठी तुम्ही फेरफार साठी अर्ज करू शकता.
- खरेदी
- वारस हक्क
- बक्षीस
- देणगी
- बोजा
- इतर फेरफार
फेरफार कुठे व कसे करावे?
फेरफार करण्यासाठी तुम्हाला तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या तलाठी कार्यालयात जावे लागेल. तिथे गेल्यावर ७/१२ Ferfar चा Form प्राप्त करावा लागेल. ह्या अर्जात तुम्हाला तुमची व तुमच्या जमिनीची माहिती तसेच फेरफार चा प्रकार आणि फेरफार ची माहिती भरावी लागते. फेरफार जा अर्ज भरून तुम्हाला तो तलाठी कडे द्यावा लागेल सोबतच आवश्यक त्या कागदपत्र्यांची प्रति आणि Ferfar Fees द्यावी लागेल.
तुमचा अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठी अर्जाची व कागद पत्रांची तपासणी करून फेरफाराची नोटीस व हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख जाहीर करतो. जर का ह्या तारखेच्या आत कोणीही आक्षेप नाही घेतला तर तलाठी फेरफार ची पुढील प्रक्रिया राबवतो.
ह्या काळात तुम्ही आपली चावडी या पोर्टल वर तुमच्या फेरफार ची माहिती, नोटीस व स्थिती बघू शकता.
टिप – ७/१२ फेरफार करण्यासाठी किंवा अधिक माहिती साठी तुमच्या तलाठी कार्यालयाला भेट द्या.
हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख का नाहि दिसत आहे ? ३ महिने झाले deal हो होऊन.
7/12utara
online pherphar kasa kadhava
3month zale ferfar zala nahi