आता ७ १२ डिजिटल स्वाक्षरी सातबारा काढणे झाले आहे अधिक सोपे. डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड आता तुम्ही Online Download करू शकता किंवा 7 12 digital Verify करू शकतो ते ही घर बसल्या.
DigitalSatbara पोर्टल काय आहे?
DigitalSatbara पोर्टल हे डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ,
eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देते. इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे पोर्टल महाराष्ट्र महसूल विभागा मार्फत चालविले जाते.
पोर्टल | DigitalSatbara |
कशासाठी | डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, eFerfar आणि Digital Property Card काढण्यासाठी आणि Verify कारणासाठी |
फीस | प्रत्येकी Rs 15 रुपये |
अधिकृत वेबसाइट | digitalsatbara.mahabhumi.gov.in |
- प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२ मिळवण्यासाठी तुम्हाला १५ रुपये Fees द्यावे लागेल.
- त्यासाठी तुम्हाला अगोदार पोर्टल वर Registration व Login करून तुमचे Wallet रिचार्जे करावे लागेल.
Available Services on DigitalSatbara Portal
Digitally Signed 7/12 | Verify 7/12 |
Digitally Signed 8A | Verify 8A |
Digitally Signed eFerfar | Verify eFerfar |
Digitally Signed Property Card | Verify Property Card |
Notes –
- काही निवडक शहरांसाठीच digitally signed सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध केलेला आहे. राहिलेले शहर हे काही काळा नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.
- जर का तुमचा digital signed 7/12 maharashtra उपलब्ध नसेल तर तलाठी कडे जाऊन हस्तलिखित सातबारा काढून त्यावर तलाठी ची स्वाक्षरी आणि शिका घेऊन तो ७/१२ तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापर करू शकता.
डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ,
eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड Download प्रक्रिया
(खालील प्रक्रिया वापरून तुम्ही डिजिटल ७-१२, ८अ, eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड काढू शकता.)
- 7/12 digitally signed असलेला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला Digital 7/12 Login करण्यासाठी या पोर्टल वर जावे लागेल.
- ह्या पोर्टल वर गेल्यावर तुम्हाला समोरील माहिती देऊन Registration करावे लागेल. रेजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमचे नवीन Account उघडावे लागेल.
- वैयक्तिक माहिती
- पत्त्याची माहिती
- लॉगिन माहिती
- रेजिस्ट्रेशन करतेवेळी तुम्ही जो Username आणि Password बनवला तो वापरून ह्या पोर्टल च्या डॅशबोर्ड digital satbara Login करून घ्या.
- जो land record तुम्हाला हवा आहे तो निवडा.
- आता तुम्हाला तुमच्या Land Details (जमिनीची माहिती) भरायची आहे जिथे तुमची जमीन आहे त्या ठिकाणची माहिती तुम्हाला भरायची आहे. जसे कि जिल्हा, तालुका, एरिया, सर्वे आणि गट नंबर.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डाउनलोड बटण येऊन जाइल. त्यावर क्लिक करून तुम्ही OK बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या DigitalSatbara अकाउंट च्या Wallet मधून Rs १५ रुपये कमी होईल. आणि लगेचच तुम्ही तुमचा डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२ pdf file मध्ये डाउनलोड किंवा Save करू शकता.
सूचना – हा digital signature 7/12, 8A, eFerfar आणि Property Card तुम्ही कुठल्याही सरकारी आणि अधिकृत कामासाठी वापरू शकता कारण या वर डिजिटल स्वरूपात तलाठीने स्वाक्षरी केलेली असते.
ss
no cantunity work to satbara uttare
plz update
jnroshankharat
डिजिटल सातबारा उताऱ्यासाठी डाऊनलोड हे ऑप्शन येत नाही