Maha Bhu Naksha (Maharashtra) – जमीन नकाशा Online

या आधी तुम्ही Online ७/१२ किंवा फेरफार काढले असतील. पण आता जमिनीचे जवळपास सर्वच रेकॉर्डस् (कागदपत्रे) आता Online उपलब्ध झालेली आहे. त्यात जमिनीचा नकाशा म्हणजेच भू नक्षा सुद्धा Online काढता येतो.

भू नक्षा म्हणजेच जमिनीचा नकाशा. जसे कि देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि भू नकाशा मध्ये दिलेली असते.

भू नक्षा मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. ह्या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.

Bhu Naksha (Nakasha) कसा बघावा

जमिनीचा नकाशा बघण्यासाठी Maharashtra शासनाने Bhu Naksha या नावाचे पोर्टल उघडले आहे. जिथे नागरिक त्यांच्या जमिनीचा किंवा प्लॉट चा नकाशा पाहू शकता.

भू नक्षा बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्लॉट चे ठिकाण हे निवडावे लागेल. त्या जागेची माहिती निवडा किंवा सूची मधून तुमच्या प्लॉट चे किंवा जमिनीचे ठिकाण निवडा.

ठिकाण निवडल्यावर तुम्ही तुमचा plot no टाका किंवा सूची मधून तो निवडा आणि search बटनावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर search result येईल त्यात तुमच्या माहिती ची सत्यता तपासून बघा. जर का प्लॉट योग्य असेल तर Map Report या बटनावर क्लिक करून द्या.

Map Report मध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात. Single Plot आणि All Plots of Same Owner या दोन्ही पैकी एक निवडून Show pdf Report हे बटन दाबावे. Single Plot मध्ये तुम्हाला फक्त एका प्लॉट ची माहिती मिळेल आणि All Plots of Same Owner मध्ये तुम्हाला एका मालकाचे एका खात्यातील सर्व प्लॉट्स दिसतील. आपल्या गरजे नुसार योग्य तो पर्याय निवडावा. pdf फाईल ओपन केल्यावर तुम्हाला Print करण्यासाठी option येईल.

Visit Bhu Nakasha

टिप – जर का तुम्हाला तुमच्या भू नक्षा मध्ये खुणा हव्या असतील तर Tree आयकॉन म्हणजेच Layers पर्याय निवडा यात तुम्हाला ज्या खुणा उपलब्ध असतील त्या खुणा भू नकाशा मध्ये दिसतील. यामुळे तुम्हाला तुमचे प्लॉट चे ठिकाण आणि सीमा ओळखायला मदत होईल.

Leave a Comment