जुना ७/१२, जुने फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड बघा

कधी-कधी आपल्या कडून जमिनीची जुनी कागद पत्रे हरवून जाता किंवा ती खूप जुनी असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळून ठेवणे खूप कठीण होऊन जाते व ती खराब होऊन जाता. जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव हि कागद पत्रे हवी असल्यास तुम्ही हि कशी प्राप्त करू शकता हे आपण ये लेखात बघणार आहोत.

जमिनीची सर्व रेकॉर्डस् हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या ती वर्षवार नुसार एका क्रमाने शासनाने जपून ठेवलेली असतात. तसेच वेळोवेळी ते कागदपत्रांवर औषधांची फवारणी करतात. जर का तुम्हाला तुमच्या परिवारा कडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना ७/१२ आणि जुने फेरफार तुम्हाला भघायचे असल्यास तुम्ही ते Online भघु शकता.

Maharashta शासनाने सर्व जुने ७/१२ आणि जुने फेरफार हे Online पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे. आता तुम्ही जमिनीचे हे जुने रेकॉर्डस् ऑनलाइन बघू शकाल.

जुने ७/१२ आणि जुने फेरफार कसे बघावे

शासनाने जुने ७/१२ आणि जुने फेरफार online बघण्यासाठी Aaple Abhilekh हे पोर्टल चालू केले आहे. या पोर्टल वर तुम्ही तुमच्या जमिनीची जुनी कागदपत्रे बघू शकता.

या पोर्टल वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिन ची माहिती देऊन Registration करून Login करून घ्यावे लागेल.

त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीच्या ठिकाणची माहिती देऊन तुम्हाला हवे ते जुने रेकॉर्ड निवडा जसे कि Old 7/12 (जुने ७/१२) आणि Old Mutation (जुने फेरफार) नाहीतर इतर जुने रेकॉर्डस् आणि search या बटनावर क्लिक करा.

तुम्ही दिलेल्या माहिती नुसार तुमच्या स्क्रीन वर काही search results येतील त्यात तुम्हाला जुने ७/१२ आणि फेरफार नंबर year wise दिसतील त्यात तुम्हाला जे हवे त्याला Add to Cart करा आणि नंतर Cart मध्ये जाऊन Download Available Files या बटनावर क्लिक करा.

शेवटी ती file ओपन करा आणि तुमचा जुना ७/१२ किंवा जुने फेरफार बघा. या फाईल ची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता.

Visit Aaple Abhilekh

नोट –

  • जर का काही कारणास्तव तुमचे जुने ७/१२ आणि जुने फेरफार या पोर्टल वर उपलब्ध नसतील किंवा aaple abhilekh पोर्टल चालत नसेल तर तुम्ही तुमच्या भूमि अभिलेख विभागाला जाऊन जुन्या जमिनीच्या कागद पत्रांसाठी अर्ज करा.
  • मात्र या ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जुने रेकॉर्डस् मिळायला वेळ लागतो कारण कागदपत्रे शोधून ते द्यावे लागतात.

Leave a Comment